स्थानिक

बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांनी ग्राहकांचे समाधान हे ध्येय ठेवावे: सर्वेश जावडेकर

समर्थ आयकॅान च्या प्रोजेक्ट ला भेट व मार्गदर्शन

बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांनी ग्राहकांचे समाधान हे ध्येय ठेवावे: सर्वेश जावडेकर

समर्थ आयकॅान च्या प्रोजेक्ट ला भेट व मार्गदर्शन

बारामती वार्तापत्र

संतुष्ट व समाधानी ग्राहक हीच ओळख निर्माण करा आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करा असा सल्ला प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व व्ही जे डेव्हलपर चे संचालक सर्वेश जावडेकर यांनी दिला .

बारामती तालुक्यातील पहिला “समर्थ आयकॅान “प्रोजेक्ट अंतर्गत हाय-राईज् बिल्डिंग “सेव्हन स्टार आयकॉन “ या इमारतीच्या होणाऱ्या जागेस भेट व बांधकाम क्षेत्रातील नव उद्योजकांना मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.

या प्रसंगी समर्थ आयकॉन ची संचालक हरीश कुंभरकर, दादासाहेब चौधर, भारत मोकाशी, मेजर अनिल कायगुडे,गणेश मोरे, संतोष दिवेकर व उदयसिंह मोरेपाटील व ऍड सचिन वाघ, दिलीप भापकर, शहाजी कुंभरकर, वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वनवे, बांधकाम व्यवसायिक रोहित घनवट ,हेमंत भोंग ,अवधूत लोखंडे व पुणे,बारामती येथील उद्योजक आणि इमारत उभी करण्यासाठी आवश्यक एजन्सी प्रतिनिधी उपस्तीत होते .

प्रकल्प करताना होणारा खर्च , मटेरिअल खरेदी , प्रकल्प व्यवस्थापन , सरकारी धोरण , बांधकामाचा वेग व निर्माण , गुंतवणूकदार, वित्त कंपन्या, ग्राहक आणि रिअल इस्टेट व्यावसाय , आर्थिक बाबी, कागदपत्रे या व अशा अन्य विषयांवर बारकाईने अभ्यास करा .बारामतीचा तालुका असून सुद्धा झपाट्याने विकास होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा झपाटा व दूरदृष्टी पहाता तालुक्याचे ठिकाण असतानाही बांधकाम क्षेत्राला मोठी मागणी आहे याचे याचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या विकासाला जाते असेही जावडेकर यांनी सांगितले.

लवकरच या वास्तूचा भुमीपुजन व शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे सर्व संचालक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!