मोरगावजवळ ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; बारामतीच्या भंडारी कुटुंबातील दोन महिला आणि एका युवकाचा मृत्यू
हे कुटुंब एका घरगुती कार्यक्रमास्तव पुण्याला गेले होते

मोरगावजवळ ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; बारामतीच्या भंडारी कुटुंबातील दोन महिला आणि एका युवकाचा मृत्यू
हे कुटुंब एका घरगुती कार्यक्रमास्तव पुण्याला गेले होते
बारामती वार्तापत्र
कार आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात झालेल्या ,बारामती शहरातील एकाच कुटूंबातील दोन महिला आणि एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती तालुक्यातील मोरगावनजिक बुधवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. या अपघातात बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांची पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी व बहिण आणि बारामतीतील व्यापारी उदय कळसकर यांची पत्नी कविता कळसकर यांचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारार्थ पुण्याला हलविण्यात आले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री मोरगावनजिक भंडारी कुटुंबीय प्रवास करत असलेल्या कारची आणि एका ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक झाली.

या भिषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बारामतीतील सराफ व्यवसायिक श्रेणीक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी, मुलगा मिलिंद आणि भगिनी कविता शहा यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर बारामती शहरात हळहळ व्यक्त होत असून भंडारी आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला