मौजे माळेगाव बु. येथे बीबीएफ यंत्राव्दारे सोयाबीन पेरणी प्रात्यक्षिक
या प्रात्यक्षिकाचे आयोजन मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषि पर्यवेक्षक रोहिदास जाधव, कृषि सहायक श्रीमती कोमल मानवसे यांनी केले होते.

बारामती वार्तापत्र
खरीप हंगाम सोयाबीन बीजप्रक्रीया, टोकणपध्दतीने लागवड व बीबीएफ यंत्रामध्ये स्थानिक पातळीवर बदल करून सोयाबीन पेरणी करणेबाबतचे प्रात्यक्षिक सौ. मंगला भालचंद्र गायकवाड, मौजे माळेगांव यांच्या शेतावर पार पडले.
यावेळी संतोष गायकवाड म्हणाले की, खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याला बिजप्रक्रीया करून मजुरांमार्फत रूंद सरीवर टोकण करून लागवड खर्च जास्त होतो. कृषि विभागाने अनुदानावर बीबीएफ यंत्र वाटप केले होते. त्यात अंशता बदल करून खरीप हंगामात सोयाबीन लागवड व त्याच रूंद सरीवर रब्बी हंगामात हरभरा व ऊसाची लागवड केल्याने खर्चामध्ये बचत करता येते. बीबीएफ यंत्रात स्थानिक पातळीवर बदल केल्योने सोयाबीन पेरणी, हरभरा पेरणी करीता वेगवेगळ्या भागातून बीबीएफ यंत्रास मागणी वाढत असल्याचे बलराम महिला स्वयंसहायता गटाचे बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषि पर्यवेक्षक रोहिदास जाधव, कृषि सहायक श्रीमती कोमल मानवसे यांनी केले होते.