मौज: मस्ती सायकल सहलींची!
सर्वांनी आपुलकीने विद्यार्थ्यांची चौकशी केली.
बारामती वार्तापत्र
शालेय जीवनात शिस्तबद्ध रीतीने धाडसी प्रवास करण्याचा हा अनुभव बरेच काही शिकवून जातो. सायकल पंक्चर होणे, चेन पडणे, सायकलवरून पडणे, दमछाक होणे या सर्वांवर जिद्दीने मात करीत हे विद्यार्थी वर्गानुसार २५ ते ८० कि.मी. सायकल चालवण्याचा अनुभव घेतात व त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते. तसेच आपल्या मुलांच्याबद्दल पालकांचाही विश्वास वाढतो.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी वर्गवार सायकल सहलींचे नियोजन केले. त्याप्रमाणे ५ वी कन्हेरी (२६.कि.मी) ६ वी राजाळे (४० कि.मी) ७ वी धुळदेव (६० कि.मी.) ८ वी फलटण (७० कि.मी) ९ वी निंबाळकर वाठार (८० कि.मी.) एकापाठोपाठ सायकल चालवणारी मुले आनंद घेत मधून अधून विश्रांती घेत निश्चित ठिकाणी पोहचले. विश्रांतीच्या वेळी पद्य, अभंग म्हणणारे विद्यार्थी हे त्या त्या गावातील नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरले.
सर्वांनी आपुलकीने विद्यार्थ्यांची चौकशी केली. प्रवासाचा आनंद लुटत सर्वांनी कष्टाने, धाडसाने अंतर पूर्ण केले. आत्मविश्वास मिळवूनच जिद्द व चिकाटी दाखवून सर्व मुले – मुली शाळेत परतली. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या क्षमतांची जाणीव देखील झाली. या सहलीत सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भाग घेतल्याचे विद्यालयाचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा या शौर्याचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वय मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा. श्री. सतिश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतिश धोकटे, सर्व संचालक, आणि आचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग यांनी केले.