क्राईम रिपोर्ट

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा खुलासा महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा खुलासा महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता

प्रतिनिधी

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.  शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काहीजणांना अटक होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा  सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक करण्यात आली. म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असूनदोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे. रात्री सुपेच्या घराची झडती घेतली तेव्हा 88 लाखांची रोकड सापडली. त्याशिवाय सोनेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram