स्थानिक

ब्लू पॅंथर सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदात्यांना ट्रॅक सूट व हेल्मेटचे वाटप

ब्लू पॅंथर सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदात्यांना ट्रॅक सूट व हेल्मेटचे वाटप

बारामती वार्तापत्र

बारामती येथे ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने मयुर भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात याहीवर्षी रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्यावर प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्रत्येक रक्त दात्यास आयोजकांच्या वतीने ट्रॅकसूट तसेच हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मा.नारायण शिरगावकर ,पोलिस निरीक्षक मा.नामदेव शिंदे ,आरोग्य निरीक्षक मा राजेंद्र सोनवणे या अधिकाऱ्यांचा कोरोणा योद्धा म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबीरास माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ,नगरसेवक गणेश भाईजी सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते सचिन नाना साबळे,सामाजिक कार्यकर्ते अशोक माने,दयावान दामोदरे,भास्कर दमोदरे,अमर भोसले,रोहन मागाडे,देविदास कांबळे यांनी भेट दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रोहित भोसले,आकाश पोळके,अनिस शेख,शंतनु जगताप,विशाल शेलार,प्रवीण भोसले,प्रज्वल भोसले,विशाल कुंभार, सरफराज पठाण इ.कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष मंगलदास निकाळजे,सचिव अक्षय शेलार ,कार्याध्यक्ष मयुर कांबळे,विक्रम थोरात यांनी सर्वाचे आभार मानले

Related Articles

Back to top button

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram