
यंग अंतरप्रेनर्स असोसिएशन ऑफ बारामती च्या वतीने जळीतग्रस्तांना मदत
जीवनाशक वस्तू दिल्या
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कानाडवाडी (चोपडज) येथील शंकर रामभाऊ भोसले यांच्या घरामध्ये विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत (मंगळवार २९ ऑगस्ट) पूर्णपणे घर भस्मसात झाले.
या आगीत घरातील कपडे ,भांडी, फ्रिज, कपाट , अन्नधान्य ,शैक्षणिक कागदपत्रे जळून भस्मसात झाली.
भोसले कुटुंबीय सामान्य शेतकरी असून सदर आगी मुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून त्यांना मानसिक धक्का बसला आहे.
बारामती येथील यंग अंतरप्रेनर्स असोसिएशन ऑफ बारामती यांनी सामाजिक दायित्व म्हणून
भोसले कुटूंबीय यांना जीवनाशक वस्तू दिल्या या प्रसंगी असोसिएशनचे सार्थक शहा, चिराग शहा, अजिंक्य गांधी ,वृषाल भोसले व “कानाडवाडी”चे संजीवकुमार भोसले, युगेंद्र भोसले, पांडुरंग कोळेकर उपस्थित होते.