यंदा इंदापूरात मानवी मनोऱ्या ऐवजी वृक्ष लागवडीची साखळी.
संकल्प प्रतिष्ठान चा अनोखा संकल्प.
यंदा इंदापूरात मानवी मनोऱ्या ऐवजी वृक्ष लागवडीची साखळी.
संकल्प प्रतिष्ठान चा अनोखा संकल्प.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दरवर्षी संकल्प प्रतिष्ठान चे गोविंदा पथक पुणे,बारामती,अकलूज,दौंड येथे जाऊन दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होतात.
आणि शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरा रचून आपले कलाकौशल्य संपूर्ण जिल्ह्यामध्ये दाखवून अनेक ठिकाणच्या दहीहंडी फोडून बक्षिसे आणि सन्मानचिन्ह मिळवत असतात. या मिळालेल्या बक्षिसांच्या रक्कमेतून वर्षभर ते सामाजिक उपक्रम संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवितात. मात्र यंदा
कोरोनाच्या महामारीमुळे संकल्प प्रतिष्ठानच्या युवकांनी वृक्ष लागवडीची साखळी निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.
त्यानुसार गोविंदानी यंदाच्या वर्षी एक गोविंदा 5 वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचा संकल्प या वर्षी केला असून सध्या वृक्ष लागवड सुरु आहे.
त्या अंतर्गत इंदापूर शहर आणि परिसरात जवळपास 1200 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
तसेच राज्यभरातील गोविंदा पथकांना देखील यंदाची दहीहंडी वृक्षरोपणा करून साजरी करण्याचे आवाहन संकल्प प्रतिष्ठान च्या माध्यमातून करण्यात आले आहे.