बारामतीच्या सुपुत्राची; भूम तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी आखलेल्या पॅटर्नची !
गावागावात दोन महिन्यांपूर्वीच केलेल्या रॅपीड टेस्ट कॅम्पचा या तालुक्यात मोठा फायदा झाला.
बारामतीच्या सुपुत्राची; भूम तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी आखलेल्या पॅटर्नची !
गावागावात दोन महिन्यांपूर्वीच केलेल्या रॅपीड टेस्ट कॅम्पचा या तालुक्यात मोठा फायदा झाला.
बारामती :वार्तापत्र
काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्याचे सुपुत्र व काश्मिरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी डोडा जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी केलेल्या पॅटर्नची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत त्यांच्या कामाचा गौरव केला होता. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात तहसीलदार असलेले बारामती तालुक्यातील ढेकळवाडीचे सुपूत्र डॉ. तुषार दादासाहेब बोरकर यांनीही अशीच भन्नाट कामगिरी केली आहे. गावागावात दोन महिन्यांपूर्वीच केलेल्या रॅपीड टेस्ट कॅम्पचा या तालुक्यात मोठा फायदा झाला.
तरुण अधिकारी नक्कीच भन्नाट कामगिरी करतात. भूम तालुक्यात योगायोगाने सारे अधिकारी तरूण असल्याने त्यांची जुळलेली विचारधारा या तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी कमालीची उपयोगी पडली आहे. डॉ. तुषार बोरकर यांचा समन्वय साधण्याचा स्वभाव, उत्तम संघटनकौशल्य आणि प्रशासकीय कामकाजावरील पकड यामुळे तालुक्यात सामूहिक यशस्वी कामगिरी साधत त्यांनी कोरोना आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक प्रगत तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भूम तालुक्यात आठ महिन्यात कोरोनाचे ६२२ रुग्ण आढळले असून त्यापैकी तब्बल ५०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या तालुक्यात अॅक्टीव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या ९९ आहे. तर कोरोनावरील उपचारादरम्यान मृत झालेल्यांची संख्या १४ एवढी आहे.
कोरोनाची महामारी थोडी संधी मिळाली की, उच्छाद मांडते आहे, हे सर्वजणच अनुभवत आहेत. अगदी पहायला गेल्यास बारामती, इंदापूरसारख्या तालुक्यांमध्ये दोन दोन वेळा लॉकडाऊन करावे लागले आहे. त्यामुळे कोरोनाला थोडी संधी मिळाली की, कोरोना फैलावतो हे साऱ्यांनीच अनुभवले आहे.