यावर्षी निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रुपात
हा ७३ वार्षिक समागम भाविक घरबसल्या ऑनलाईन पाहू शकणार आहेत.
यावर्षी निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रुपात
हा ७३ वार्षिक समागम भाविक घरबसल्या ऑनलाईन पाहू शकणार आहेत.
बारामती वार्तापत्र
सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने ७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रुपात ५, ६ व ७ डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी दिल्ली येथे होणाऱ्या निरंकारी वार्षिक समागमसाठी जगभरातून लाखो भाविकांची उपस्थिती असते. सर्व भाविक या समागमाचा आनंद घेतात, मात्र यावर्षी वैश्विक कोरोना महामारीमुळे भारत सरकारने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन संत समागम व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येत आहे.
हा ७३ वार्षिक समागम भाविक घरबसल्या ऑनलाईन पाहू शकणार आहेत. या समागमाचे प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर, तसेच समागम संस्कार वाहिनीवर तिन्ही दिवशी सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊ या वेळात प्रसारित करण्यात येईल.
यावर्षी निरंकारी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ आहे. संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगभरात सत्य, प्रेम, एकत्वाचा संदेश देत आहे. कोव्हीडच्या महामारीच्या काळात संत निरंकारी मिशनने सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करत सामाजिक अंतर ठेवणे व मस्कचा वापर करणे, मास्क वापरा निरंतर, ठेवा सामाजिक अंतर, समाजकल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, निरंकारी सत्संग भवन क्वारंटाईन सेंटर म्हणून प्रदान करणे इत्यादी विविध सेवांचा समावेश आहे.