युवकांनी व्यसनाधीनता पासून मुक्त झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही— जिल्हा न्यायाधीश भालेराव साहेब यांचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात प्रतिपादन
जयंती महोत्सव समिती व विविध सामाजिक संघटना यांनी सहकार्य केले
युवकांनी व्यसनाधीनता पासून मुक्त झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही— जिल्हा न्यायाधीश भालेराव साहेब यांचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात प्रतिपादन
जयंती महोत्सव समिती व विविध सामाजिक संघटना यांनी सहकार्य केले
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 नोव्हेम्बर २०२१ रोजी सिध्दार्थ नगर
बारामती, जिल्हा पुणे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
व्यसनाधीनते पासून समाज मुक्तता झाल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही असे प्रतिपादन बारामती येथील मा.जिल्हा व सञ न्यायाधीश आदरणीय S.T. भालेराव साहेब यांनी. केले तसेच मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्क व अधिकार यांची जाणीव प्रत्येकास होणे आवश्यक आहे, शारीरीक गुलामी पेक्षा मानसिक गुलामी खुप भयंकर आहे तसेच सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारामती वकील संघटनेचे अॅङ चंद्रकांत सोकटे यांनी केले , ना.ल.सा. मार्फत राबविण्यात येणार योजना बाबतची माहिती अॅङ अमोल सोनवणे यांनी केली यावेळी बारामती वकील संघटनेचे सचिव अॅङ अजित बनसोङे , ग्रंथपाल अॅङ स्वरूप सोनवणे अॅङ प्रणिता जावळे, अॅङ शिंगाडे, अॅङ नवले अॅङ सुरेश कांबळे अॅङ राजेंद्र काळे अॅङ अविनाश गायकवाड अॅङ किरण सोनवणे अॅङ राहूल सोनवणे अॅङ वैभव कांबळे अॅङ प्रविण कांबळे, अॅङ विशाल गव्हाळे
व अनेक सिनीयर ज्यूनिअर वकील , लोंढे भाऊसाहेब, मिलींद देवुळगावकर ,आकाश खंदारे भाऊसाहेब हजर होते .
उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सिध्दार्थ नगर बुध्द विहार समिती तसेच ङाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व विविध सामाजिक संघटना यांनी सहकार्य केले तसेच यावेळी समाजातील विविध राजकीय सामाजिक धार्मिक काम करणारे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष कैलासजी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भारतदादा अहिवळे, व स्थानिक प्रतिनिधीचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी माजी नगरसेवक अभिजित चव्हाण व ॲड सशिल अहिवळे यांनी विशेष परिश्रम घेतले उपस्थितांचे आभार अॅङ सुशिल अहिवळे यांनी केले