युवा महोत्सव मध्ये कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय आघाडीवर
२१ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव

युवा महोत्सव मध्ये कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय आघाडीवर
२१ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव
बारामती वार्तापत्र
राज्यस्तरीय इंद्रधनुष्य २०२५ स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पटकावले द्वितीय पारितोषिक यामध्ये विद्या प्रतिष्ठान कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीच्या विद्यार्थिनीचा सहभाग दि. १७ ते १८ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे इंद्रधनुष्य (युवा महोत्सव) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी विद्या प्रतिष्ठान कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीतून चार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी लोकनृत्य, नाटक (थिएटर), माइम (मूक अभिनय) आणि फोल्क ऑर्केस्ट्रा या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.
या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी अवनी सवळे (माइम) आणि आराधना डुकरे (लोकनृत्य, नाटक) यांची दि. ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणार्याल २१ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ २०२५ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठ येथे स्पर्धासाठी निवड झाली.
या स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने माइम (सायलेंट अॅक्ट) स्पर्धेत द्वितीय पारितोषिक जिंकले. यामध्ये माइम संघाचे प्रतिनिधित्व विद्याप्रतिष्ठान जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीची विद्यार्थिनी अवनी सावळे हिने केले या संघाला राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक मिळाले.
या संघाला महात्मा फुले कृषी विद्यापीठचे संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी याचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
तिच्या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष शरद पवार , उपाध्यक्ष अँड, अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव अँड नीलिमा गुजर, विश्वस्त अजित पवार, विठ्ठलदास मणियार, सौ. सुप्रिया सुळे, सौ सुनेत्रा पवार, प्रतापराव पवार, डॉ राजीव शहा, श्री किरण गुजर श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार कर्नल श्रीषं कंबोज तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुमन देवरुमठ, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका प्रतिक्षा भगत व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.






