यु एस डी ए अंतर्गत अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाचा बारामती च्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सोबत करार
भारतातील कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधन आणि बारामती, यांची एक सांगड निर्माण होऊन जगामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली - डॉ. क्रिस प्रोक्टोर, शास्त्रज्ञ नेब्रास्का विद्यापीठ, अमेरिका

यु एस डी ए अंतर्गत अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाचा बारामती च्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सोबत करार
भारतातील कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधन आणि बारामती, यांची एक सांगड निर्माण होऊन जगामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली – डॉ. क्रिस प्रोक्टोर, शास्त्रज्ञ नेब्रास्का विद्यापीठ, अमेरिका
बारामती वार्तापत्र
बारामती च्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ने भारतामध्ये प्रथमच संस्थेचे विश्वस्थ मा. श्री प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेत मागील पाच वर्षापासून संशोधन करून अनेक शेतकऱ्यांची उसशेतीतील यशोगाथा निर्माण केल्यामुळे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे त्याचीच दखल अमेरिकेचे एलोन मस्क आणि सत्यम नडेला यांनी स्वतःच्या प्रसिद्धी माध्यमावर केल्यामुळे आज केवळ भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगात बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे नाव कृषि क्षेत्रातील बुद्धीमात्तेसोबत जोडल्या गेले आहे.
त्याच अनुषंगाने नुकतेच अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठाने बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सोबत सोयाबिन आणि मका या पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन वर्षासाठी सामंजस्य करार केला आणि लगेचच त्याची अंमलबजावणी करत बारामती परिसरातील कृत्रिम कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे प्रगतशील शेतकऱ्यांसाठी एक प्रशिक्षण घेतले आणि याच प्रशिक्षणाचे पुढील तीन भाग पुढील काही महिन्यामध्ये घेण्यात येतील असे जाहीर केले.
सुरुवातीला आभासी कार्यशाळा USDA-ARS अडॅप्टिव्ह क्रॉपिंग सिस्टम प्रयोगशाळेचे अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी बारामती के व्ही के चे शास्त्रज्ञाना या कार्यशाळेत रोपांची वाढ, माती प्रक्रिया, हवामानाचा प्रभाव आणि सिंचन आणि फर्टिलायझेशन यासारख्या व्यवस्थापन पद्धती समजून घेण्यासाठी क्लासिम सारख्या साधनांचा वापर करून क्रॉप सिम्युलेशन मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित केले आहे. सुरुवातीला या मध्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाची रचना, पीक वाढ आणि विकास मॉडेलची मूलभूत माहिती दिली आणि पीक वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी CLASSIM सिम्युलेशन टूलचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
नंतर दुसऱ्या सत्रात अमेरिकेच्या नेब्रास्का वॉटर सेंटरद्वारे डॉ. क्रिस प्रोक्टोर, डॉ. जुडे कोबिंग आणि डॉ.चित्तरंजन राय या शास्त्रज्ञांनी मका आणि सोयाबीन शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून आपल्या निसर्गानुरूप आपल्याला कसे बदल केले तर जास्तीत जास्त शेतकर्यांना कसा फायदा होऊ शकेल या बद्दल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षाना दरम्यान शेतकर्यांनी देखील त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल त्यांचे अनुभव समाधानाने व्यक्त केले.
याबद्दल संस्थेचे प्रमुख माननीय राजेंद्र पवार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश आणि डॉ सचिनकुमार नांदगुडे, सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी समाधान व्यक्त केले आणि शेतकऱ्यांना आणि शास्त्रज्ञाना शुभेच्छा दिल्या.
“सोयाबिन आणि मका शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणेसाठी अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाचा मोलाचा वाटा ठरेल आणि भारतातील कृषि संशोधनाला वेगळी दिशा मिळेल”- राजेंद्र पवार






