स्थानिक
बारामतीत अजितदादांच्या आदेशाला हरताळ!; फ्लेक्सबाजीमुळे शहर होतेय विद्रूप
बारामती शहरात पुन्हा एकदा फ्लेक्सबंदीचा विषय चर्चेत आला आहे.

बारामतीत अजितदादांच्या आदेशाला हरताळ!; फ्लेक्सबाजीमुळे शहर होतेय विद्रूप
बारामती शहरात पुन्हा एकदा फ्लेक्सबंदीचा विषय चर्चेत आला आहे.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सूचना देऊनही शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स व बॅनर्स लावून विद्रूपीकरण सुरूच आहे.
मुख्य चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी राजकीय बॅनर्स, शुभेच्छा फ्लेक्स यांचा सुळसुळाट झाल्याने शहराचे सौंदर्य बाधित होत आहे. नगरपरिषदेने यावर कारवाई करण्याऐवजी कानाडोळा केल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
मुख्याधिकाऱ्यांकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. काही ठिकाणी पावसामुळे फ्लेक्स कोसळून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरातील स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी फ्लेक्सबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.






