इंदापूर

योजनांची माहिती आपल्या दारी’ लोककला पथकांद्वारे इंदापूर तालुक्यात गावोगावी जनजागृती नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कला पथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

योजनांची माहिती आपल्या दारी’ लोककला पथकांद्वारे इंदापूर तालुक्यात गावोगावी जनजागृती नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कला पथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बारामती वार्तापत्र

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

इंदापूर तालुक्यातील सणसर, वालचंदनगर, बोरी, इंदापूर, निमगाव केतकी आणि कळस येथे दोन दिवस कार्यक्रम सादर करण्यात आले.

राज्य शासनाने दोन वर्षात अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. या योजनांची माहिती नागरिकांना व लाभार्थ्यांना व्हावी आणि त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी लोककला पथकांच्या माध्यमातून ही माहिती गावोगावी पोहचवली जात आहे.

या कार्यक्रमात कोविड काळात नागरिकांना केलेली मदत, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिवभोजन थाळी योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना, खावटी योजना, मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण, ऊस तोड कामगारांसाठी विमा योजना, मेट्रो, महामार्ग, रस्ते सुधार योजना, कामगारांसाठी श्रम ई कार्ड योजना यासह विविध योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून या पथकांनी दिली.

कला पथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Back to top button