रक्ताला धर्म,जात,पंथ नसते: बिरजू मांढरे
खासदार सुनेत्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्नङ

रक्ताला धर्म,जात,पंथ नसते: बिरजू मांढरे
खासदार सुनेत्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
बारामती वार्तापत्र
मानवाच्या जीवनात रक्तदान चे खूप मोठे योगदान आहे.एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविणे साठी रक्त महत्वाचे असते त्यामुळे रक्तदान करा , रक्तदानासाठी कोणती धर्म जात पंथ नसल्याचे प्रतिपादन बारामती नगर परिषद चे मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी केले.
गुरुवार १६ ऑक्टोम्बर रोजी खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बिरजू मांढरे मित्र परिवार च्या वतीने रक्तदान शिबिर चे आयोजन केले होते या प्रसंगी बिरजू मांढरे यांनी सांगितले.
उदघाटन समारंभ मा. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या शुभहस्ते करण्यात आले
या प्रसंगी मा. नगरसेवक अभिजित चव्हाण, बाळासाहेब जाधव,मार्केट कमिटी संचालक शुभम ठोंबरे व ऋषी देवकाते, अजीज शेख ,अरविंद बगाडे, राजू मांढरे, सतीश खुडे व श्रीहरी भाऊ तेलंगे मित्र मंडळ, साईच्या सेवा ट्रस्ट, भाऊसाहेब मांढरे मित्रपरिवार, लहुजी वस्ताद दहीहंडी संघ, जय भवानी मित्र मंडळ चे सहकारी उपस्तीत होते.
बारामती सह इंदापूर, फलटण तालुक्यातील युवकांनी रक्तदान केले.
नेत्र तपासणी,आरोग्य तपासणी , पर्यावरण,स्वछता,महिलांना रोजगार निर्मिती,ग्रामीण भागातील युवक उद्योजक बनविणे,आदी कार्यातून सुनेत्रा वहिनी यांनी सर्व सामान्य मध्ये ओळख निर्माण करून आदर्शवत कार्य केल्याचे बिरजू मांढरे यांनी सांगितले.
प्रत्येक रक्तदात्यास प्रमानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट:
वहिनी च्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन म्हणजे सामाजिक जाण व भान असल्याची ओळख आहे :
किरण गुजर.