स्थानिक

रणधुमाळी सुरू!बारामतीत नगराध्यक्षपदाची संधी कुणाला मिळणार..? अजितदादांच्या त्या वक्तव्यामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली..

मी योग्य करतो पण कायमचं चांगलं केलं तरी ते माझ्याकडे पाठच फिरवतात.

रणधुमाळी सुरू!बारामतीत नगराध्यक्षपदाची संधी कुणाला मिळणार..? अजितदादांच्या त्या वक्तव्यामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली..

मी योग्य करतो पण कायमचं चांगलं केलं तरी ते माझ्याकडे पाठच फिरवतात.

बारामती वार्तापत्र 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलताना माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांना कसं नगराध्यक्ष केलं हे सांगितलं.

यावेळी बोलताना पवार म्हणाले,पोर्णिमा तावरेला मी ओपन जागेवरती नगराध्यक्ष केलं.तिने मला उद्धव गावडे यांचे नाव सांगितलं होतं. तिला काय माहिती मी तिलाच तिकीट देणार आहे ते.मी तिला तिकीट दिलं निवडून आणलं आणि तिने पाच वर्षे काम केलं.सांगायचं तात्पर्य मी योग्य करतो पण कायमचं चांगलं केलं तरी ते माझ्याकडे पाठच फिरवतात.

आणि समोर असलेले नागरिक पाठ फिरवत नाहीत त्यामुळे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि समोर बसलेल्या लाडक्या बहिणी माझ्याबरोबर आहेत. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये विरोधकांना एकत्र करत निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला.त्यामध्ये सोमेश्वर व छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांना यश आले.मात्र माळेगाव कारखान्यामध्ये विरोधकांमी थेट निवडणूक लढवली.

त्यामुळे आत्ता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांना सोबत घेऊन बारामतीचा विकास इंदूरच्या धर्तीवर करणार असल्यामुळे विरोधी पक्षांना सोबत घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट;

आता बारामतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण साठी आरक्षित झाल्यामुळे सर्वसाधारण पुरुष किंवा महिलेला संधी देणार का इतर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button