रमजान ईद, अक्षय तृतीया,भोंगे, या पार्श्वभूमीवर बारामतीत पोलिसांचे संचलन.. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
आठ अधिकारी 25 पोलीस कर्मचारी आर सि पी दोन पथक होमगार्डचे 11 जवान यांनी संचलनात भाग घेतला.
रमजान ईद, अक्षय तृतीया,भोंगे, या पार्श्वभूमीवर बारामतीत पोलिसांचे संचलन.. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
आठ अधिकारी 25 पोलीस कर्मचारी आर सि पी दोन पथक होमगार्डचे 11 जवान यांनी संचलनात भाग घेतला.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात पोलिसांचे संचलन आगामी रमजान ईद अक्षय तृतीया. भोंगे वरून सुरू असलेला वाद. याचे पार्श्वभूमीवर पोलीस दलाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. बारामती मध्ये तरी सामाजिक सलोखा चांगला असला. तुम्ही कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मिश्र वस्तीतून पोलिसांनी संचालन केले. तसेच एखाद्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी पोलीस तत्पर असावेत. म्हणून संचलन घेऊन. त्यांना आणीबाणीच्या वेळेस करावयाच्या कारवाईची उजळणी घेतली .
तसेच उद्या सकाळी पोलिस साठी जमाव पांगवण्यचे प्रशिक्षण व उजळणी टी सी कॉलेजच्या मैदानावर सकाळी घेण्यात येणार आहे. सदरची कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले आठ अधिकारी 25 पोलीस कर्मचारी आर सि पी दोन पथक होमगार्डचे 11 जवान यांनी संचलनात भाग घेतला. बारामती मध्ये कोणीही सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल