रमजान ईद च्या निमित्ताने कोरोना प्रतिकारक गोळ्यांचे वाटप व कोरोना सोल्जर्स चा सन्मान.
बारामती:वार्ताहर रमजान ईद च्या निमित्ताने कोरोना च्या पार्श्वभूमीवर देसाई इस्टेट येथे मुस्लिम बांधवांना कोरोना होऊ नये व प्रतिकार शक्ती वाढविणे साठी 'अरसेनीक अल्बम- 30'
रमजान ईद च्या निमित्ताने कोरोना प्रतिकारक गोळ्यांचे वाटप व कोरोना सोल्जर्स चा सन्मान.
बारामती:वार्ताहर रमजान ईद च्या निमित्ताने कोरोना च्या पार्श्वभूमीवर देसाई इस्टेट येथे मुस्लिम बांधवांना कोरोना होऊ नये व प्रतिकार शक्ती वाढविणे साठी ‘अरसेनीक अल्बम- 30’
गोळ्यांचे वाटप करण्यात आले व लॉकडाऊन च्या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोरोना सोल्जर्स चा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष व माळेगाव साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप,नगरसेवक अतुल बालगुडे,जळोची चे माजी सरपंच छगन आटोळे,न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे, उद्योजक समीर आत्तार,हिरालाल बागवान,कासम शेख, इरफान बागवान,अलम बागवान,साहिल बागवान,शाहरुख शेख,तोहित शेख,आयुब शेख,सोहेल आत्तार,रियाझ शेख,श्री गणेश तरुण मंडळ चे अध्यक्ष अनिल खंडाळे आदी मान्यवर उपस्तीत होते. रमजान ईद च्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सामाजिक कार्याचे आयोजन करून परिसरातील नागरिकांना कोरोना संसर्ग होऊ नये या साठी करत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे योगेश जगताप यांनी सांगितले. कोरोना सोल्जर्स चे लॉकडाऊन च्या काळातील कार्य कौतुकास्पद असल्याचे कार्यक्रमाचे आयोजन समीर आत्तार यांनी सांगितले. आभार सलीम सय्यद यांनी मानले. सोहेल आत्तार यांनी सूत्रसंचालन केले.