रमाई आवास योजनेतील प्रलंबित घरकुल प्रकरणांबाबत इंदापूर नगरपरिषदेवर धडक मोर्चा
त्वरित अंमलबजावणी न झाल्यास बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
रमाई आवास योजनेतील प्रलंबित घरकुल प्रकरणांबाबत इंदापूर नगरपरिषदेवर धडक मोर्चा
त्वरित अंमलबजावणी न झाल्यास बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
रमाई आवास योजनेसाठी इंदापूर नगरपरिषदेने सन २०१५ मध्ये प्रस्ताव मागितले होते. यावेळी कागदपत्रांची पूर्तता करून लोकांनी घरकुलासाठी अर्ज नगरपरिषदेकडे सन २०१५ मध्ये देऊन जवळपास ६ वर्षे झाली.तरी देखील रमाई आवास घरकुल प्रकरणांची अंमलबजावणी झाली नसल्याकारणाने संबंधित नागरिकांनी नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
रमाई आवास योजनेतील घरकुलांची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास इंदापूर नगर परिषदे समोर (दि. १८) फेब्रुवारी पासून ते (दि.२८) फेब्रुवारीपर्यंत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून (दि.१) मार्च २०२१ ते (दि.७) मार्च २०२१ पर्यंत चक्री उपोषण करीत असल्याचे निवेदनात म्हटले असून (दि.८) मार्च नंतर इंदापूर नगरपरिषदे समोर घरकुलांना मंजुरी देई पर्यंत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे.यावेळी आंदोलकर्त्यांचे काही बरे वाईट झाल्यास व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इंदापूर नगरपरिषद प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संजय शिंदे, ॲड.किरण लोंढे,नानासाहेब चव्हाण,रोहित ढावरे,उमेश ढावरे,नागेश भोसले,संजय कांबळे,अक्षय मखरे, आझाद सय्यद,अनिल गोरे,पिनू राऊत,यादव ढावरे,आकाश अडसूळ,विकास शिंदे,बाळासाहेब ढावरे,सचिन ढावरे,नागेश केंगार यांसह महिलांचा देखील या धडक मोर्चात सहभाग होता.
या प्रसंगी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात विविध घोषणाबाजी करत याबाबतचे निवेदन प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर यांकडे देण्यात आले.
यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर म्हणाल्या की,कोणीही लाभार्थी रमाई आवास योजनेपासून वंचित राहणार नसून याची सर्व खबरदारी इंदापूर नगरपरिषद प्रशासन घेईल.