स्थानिक

रयत बँकेच्या बारामती शाखेचा 32 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

2800 कोटी भाग भांडवल असलेल्या आणि 11500 सभासद

रयत बँकेच्या बारामती शाखेचा 32 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

2800 कोटी भाग भांडवल असलेल्या आणि 11500 सभासद

बारामती वार्तापत्र 

रयत शिक्षण संस्थेची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत को ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी बारामती शाखेचे चेअरमन श्री अशोक कोलते,शाखा प्रतिनिधी श्री निलेश गायकवाड,श्री सुनील म्हस्के,शाखाधिकारी श्री गजानन बडवे,माजी शाखा प्रतिनिधी गणेश कोंढाळकर,शाहू विद्यालयाचे प्राचार्य गणपत तावरे, टेक्निकल विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे, डोर्लेवाडी चे मुख्याध्यापक श्री तुकाराम खताळ ,माजी प्राचार्य श्री दत्तात्रय गाढवे,श्यामराव जाधव,कुंडलिक धायगुडे, दत्तात्रय खताळ,सौ.किशोरी सातव श्री शत्रुघ्न सोनटक्के, भोसले सर,श्री भागवत सर,श्री ज्ञानदेव म्हस्के तसेच अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2800 कोटी भाग भांडवल असलेल्या आणि 11500 सभासद असलेल्या या रयत बँकेच्या माध्यमातून अनेक रयत सेवकांना तात्काळ कर्ज उपलब्ध होते.यावेळी शाखा समितीचे चेअरमन श्री अशोक कोलते यांनी बँकेच्या विविध सेवांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी प्रास्ताविक श्री निलेश गायकवाड सर यांनी व आभार श्री चंद्रकांत देवकाते सर यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री गणेश कोंढाळकर यांनी केले.

Back to top button