रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनि. कॉलेजचा १०० टक्के निकाल
शाळा समिती व शिक्षक वर्गाकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतु
रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनि. कॉलेजचा १०० टक्के निकाल
शाळा समिती व शिक्षक वर्गाकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतु
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची घोषणा बुधवारी (दि.८)झाली.यामध्ये इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनि. कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेस सामोरे जावे लागले,तरी देखील लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त करत विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.
या परीक्षेमध्ये विज्ञान विभागात कु.ठाकूर स्नेहल प्रेमसिंग या विद्यार्थिनीने ६०.८३% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कु.अलिशा अस्लम शेख या विद्यार्थिनीने ६०.३३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तसेच कु. राजेश्वरी अभिजित डिचले या विद्यार्थिनीने ६०.१७ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना ज्युनि. विभागाचे विभागप्रमुख प्रा.धेंडे विजय, मनिषा बोधले,प्रेम कडवळे, ऋषिकेश थोरात, सोनाली कदम,रुचिता घाडगे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे ,शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, डॉ.श्रेणीक शहा, डॉ.लहू कदम, विठ्ठल ननवरे, माजी विद्यार्थी कैलास कदम, श्रीधर बाब्रस, पर्यवेक्षक विजय शिंदे इत्यादींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.