स्थानिक

‘रागिनी फाऊंडेशन’च्या माध्यमातून ४२५ साड्यांचे वितरण..!

‘रागिनी फाऊंडेशन’च्या माध्यमातून ४२५ साड्यांचे वितरण..!

बारामती वार्तापत्र

बारामती :येथील रागिनी फाऊंडेशन च्यावतीने
“साडी बँक” या उपक्रमाची सुरुवात दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आली. यासाठी साड्यांचे संकलन करण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले, या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती आणि परिसरातील महिलांनी व त्यांच्या बचत गट, सोसायटी तसेच विविध महिला मंच यांनी या उपक्रमांमध्ये ४२५ साड्यांचे संकलन केले होते. दि …रोजी या साड्यांचे वाटप ऊस तोड करणाऱ्या महिलांना करण्यात आले.

” महिलांसाठी साडी ही आवश्यक बाब असून, अन्न वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मधील एक घटक आहे, त्यामुळे समाजातील महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन, आपल्याकडे असणाऱ्या जास्ती च्या साड्या ‘साडी बँक’ या उपक्रमात दान कराव्यात,
इतर महिलांना त्याचा वापर होऊ शकतो, वस्त्र ही त्यांची गरज पूर्ण होऊ शकते. या उद्देशाने साडी बँक हा उपक्रम सुरू केला असल्याचे रागिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले.

साडी वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी आणि सोमेश्वर साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे करण्यात आला. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तरित्या उपस्थितीती दर्शवली. या उपक्रमासाठी रागिनी फाऊंडेशनच्या साक्षी आंबेकर, दीपाली पवार, ज्योती बोधे, वनिता जाधव, सुजाता जाधव यांनी मदत केली. कार्यक्रमासाठी दिनकर आगम,मच्छिंद्रनाथ म्हेत्रे तसेच टाटा ट्रस्ट संचलित टीम आशाचे संतोष शेंडकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram