राजकारणात चांगल्या माणसांची गरज — निमगाव केतकीतील ॲड. सचिन राऊत यांना उमेदवारी द्यावी अशी जनतेतून मागणी !
समाजासाठी सतत झटणारा चेहरा...

राजकारणात चांगल्या माणसांची गरज — निमगाव केतकीतील ॲड. सचिन राऊत यांना उमेदवारी द्यावी अशी जनतेतून मागणी !
समाजासाठी सतत झटणारा चेहरा…
इंदापूर –
इंदापूर तालुका सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा माहोल रंगू लागला असून विविध गटातून इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे. मात्र, या स्पर्धेत “राजकारण म्हणजे पैसा असलेल्यांचा खेळ” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. पैसेवाले लोकच उमेदवार ठरतात आणि समाजासाठी झटणारे कार्यकर्ते बाजूला पडतात, अशी जनतेची खंत आहे.
याच पार्श्वभूमीवर निमगाव केतकी येथील ॲड. सचिन नारायण राऊत या तरुण तडफदार आणि कार्यक्षम नेत्याला यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी मागणी स्थानिक युवक आणि नागरिकांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
✳️ समाजासाठी सतत झटणारा चेहरा
“चांगलं काम करायला पद लागत नाही” या विचाराने प्रेरित होऊन गेल्या अनेक वर्षांपासून ॲड. राऊत हे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.
‘नेचर क्लब’च्या माध्यमातून त्यांनी वर्षभर वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
कोरोना काळात अनेक अत्यावस्थ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून “आरोग्यदूत” व “कोरोना योद्धा” हे पुरस्कार प्राप्त केले.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे व भरपाई मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून वैयक्तिक आर्थिक मदत दिली.
पूरग्रस्तांना शासकीय योजना मिळवून देत त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले.
✳️ शेतकऱ्यांचा कैवारी
निमगाव केतकी परिसरातील शेतकऱ्यांचे टोमॅटो विक्रीतील शोषण थांबवण्यासाठी त्यांनी सुमारे २०० शेतकऱ्यांना एकत्र करून दलाली पद्धत बंद केली. या लढ्यातून ते “शेतकऱ्यांचे कैवारी” म्हणून ओळखले जाऊ लागले.
✳️ विकासासाठी प्रयत्नशील
जिल्हा परिषद शाळेसाठी ₹५ लाखांचा ई-लर्निंग निधी,भैरवनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी ₹१० लाख निधी,कॅनलवर लोखंडी ब्रिजसाठी ₹३ लाख,सहा नंबर वार्डातील विविध विकास कामांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा.
तसेच केतकेश्वर विद्यालयात व्याख्यानमाला, सार्वजनिक जयंती उत्सवात विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप असे अनेक उपक्रम ते राबवत आहेत.
✳️ सामाजिक व नैतिक भुमिका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे योग्य नियोजन आणि प्रशासनाला मदत, समाजातील विविध संघटनांना सामाजिक व बौद्धिक मदत देणे हेही त्यांच्या कार्याचा भाग आहे.ॲड. राऊत यांनी कोल्हापूर महापुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला.
निमगाव केतकी येथील ॲम्बुलन्स “पळवण्याचा” प्रयत्न होत असताना त्यांनी तत्काळ आवाज उठवून ती पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आणली — या त्यांच्या तात्काळ कृतीचे गावभर कौतुक झाले.
✳️ “पद नव्हे, समाजसेवाच माझं ध्येय”
निवडणुकीबद्दल विचारले असता ॲड. राऊत म्हणाले,
“गेल्या वीस वर्षांपासून मी लोकांसाठी झटतो आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात मला समाधान आहे.”
मात्र, त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांना संधी द्यावी, अशी मागणी वाढत चालली आहे.

*💬 “पैशाने नव्हे, पण कार्याने नेता ओळखला जावा”*
अशी भावना निमगाव केतकी ग्रामस्थ आणि युवकांनी व्यक्त केली असून —
ॲड. सचिन राऊत यांच्यासारख्या प्रामाणिक, जनतेत मिसळणाऱ्या, आणि निःस्वार्थी कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यासच राजकारणात चांगल्या माणसांची संख्या वाढेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
 
					






