राजकिय द्वेषातुन केलेला ४५ लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा अखेर नामंजूर
प्रतिवादीतर्फे बदनामी झालीच नाही याबाबतचे सर्व पुरावे दाखल

राजकिय द्वेषातुन केलेला ४५ लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा अखेर नामंजूर
प्रतिवादीतर्फे बदनामी झालीच नाही याबाबतचे सर्व पुरावे दाखल
बारामती वार्तापत्र
बारामती येथील सिव्हील जज्ज सिनीयर डिव्हीजन सो यांचे कोर्टात सुवर्णा दादा थोरात यांनी पिंपळी ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच यांचेसह सात सदस्यांविरोधात अब्रु नुकसान प्रकरणी प्रत्येक प्रतिवादी यांनी पाच लाख रुपये असे नऊ प्रतिवादी यांनी एकुण पंचेचाळीस लाख रुपये भरपाई द्यावी म्हणून दावा केला होता.
परंतु सदरच्या दाव्यामध्ये वादी यांनी त्यांची बदनामी कशी झाली याबाबतचे सर्व पुरावे दाखल केले होते. प्रतिवादीतर्फे बदनामी झालीच नाही याबाबतचे सर्व पुरावे दाखल केले व त्यासंबंधीचा युक्तिवाद केला.
दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मे. न्यायालयाने सदर वादी यांचे पतीची कुठेही बदनामी झाली नाही तसेच काही केसेस वादी यांचे पति विरूद्ध दाखल असल्याचे दिसुन येत असल्याचे मे.कोर्टाने ग्राह्य धरूण सदरचा दावा खारीज केला.
प्रतिवादी तर्फे ॲड सचिन वाघ, ॲड अमरसिंह मारकड यांनी काम पाहिले तर ॲड सचिन मोरे, ॲड सौरभ अहिवळे, ॲड हर्षद थोरात,ॲड विशाल रणदिवे यांनी कामात सहकार्य केले.
कोर्ट निकाला नंतर मे.कोर्टाने केलेल्या योग्य न्यायदानाचे स्वागत करीत वादी तर्फे कोर्टात केस लढविणारे ॲड सचिन वाघ, ॲड अमरसिंह मारकड व त्यांचे सहकारी यांचा सत्कार सन्मान ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांच्या वतीने करण्यात आला.