राजकीय वातावरण तापलं;देवाभाऊच महाराष्ट्राचे चाणक्य असा उल्लेख असलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बॅनर बारामतीत फाडलं आणि जाळलं!
भव्य असं बॅनर नगर परिषदेच्या समोर लावलं होतं.
राजकीय वातावरण तापलं;देवाभाऊच महाराष्ट्राचे चाणक्य असा उल्लेख असलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बॅनर बारामतीत फाडलं आणि जाळलं!
भव्य असं बॅनर नगर परिषदेच्या समोर लावलं होतं.
बारामती वार्तापत्र
नागपूरमध्ये महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा सुरू होता. तर दुसरीकडे बारामतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे.
अज्ञात तरुणांनी देवेंद्र फडणवीस यांचं चाणक्य म्हणून लावलेलं बॅनर फाडलं आणि जाळून टाकलं. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती नगर परिषदेसमोर ही घटना घडली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भव्य असं बॅनर नगर परिषदेच्या समोर लावलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाणक्य असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला होता.
पण संध्याकाळी काही अज्ञात तरुणांनी हे बॅनर फाडून टाकलं. जोरदार घोषणाबाजी करच देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरला आग लावून टाकली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे त्यांनी पाहणी करून अज्ञात तरुणांचा शोध घेत आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवार हेच राजकीय चाणक्य असल्याचं महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून म्हटलं जात होतं. कारण, लोकसभा निवडणुकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. तसेच, त्यांचे 9 खासदार निवडून आले होते. तर, राज्यात महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळालं होतं. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीतही मविआला मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मात्र, मविआचा दारुण पराभव झाला. त्यामुळे, महायुतीच्या विजयाचं श्रेय भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनाच दिले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बारामती नगर परिषदेसमोर लावण्यात आलेला बॅनर अज्ञाताने पेटवला आहे. मात्र, बॅनर पेटवल्यानंतर तो अर्धा जळाला असून अर्धाच शिल्लक राहिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बारामतीत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजपच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाणक्य असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे बारामतीमधील काही अज्ञातांनी हा बॅनर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.