राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वीचा १०० टक्के निकाल
जीवशास्त्र विषयात कु.कल्याणी माने राज्यात तिसरी
राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वीचा १०० टक्के निकाल
जीवशास्त्र विषयात कु.कल्याणी माने राज्यात तिसरी
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.८) जाहीर झाला. यामध्ये राजमाता आहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाचे कला व विज्ञान शाखेच्या सर्वच्या सर्व परीक्षार्थींनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
विद्यार्थी, प्राध्यापक व पालक यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याने इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी विद्यार्थी, प्राध्यापक, पालक यांचे अभिनंदन केले आहे.
कॉलेजमधील विज्ञान शाखा कु. कल्याणी समाधान माने ( ८३.८३%), कु. साक्षी संजीव गायकवाड (८२.६७%), कु. पुनम अनिल तोंडे (८२.३३%) ह्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर कला शाखेत प्रथम क्रमांक कु. निकिता विकास काटे (७३.६७%), द्वितीय क्रमांक कु. प्रीती ईश्वर पवार ( ७१.८३%), तृतीय क्रमांक कु. माधवी सुधाकर लोंढे (६८.५०%) या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. कु.कल्याणी समाधान माने हिने जीवशास्त्र विषयात १०० पैकी ९८ गुण संपादन करून राज्यात तिसरा येण्याचा मान पटकावला आहे. कु. कल्याणी मानेच्या ह्या अप्रतिम यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्राचार्या अनिता साळवे, उपप्राचार्या सविता गोफणे व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.