राजवर्धन पाटील यांनी गुढीपाडवाचा आनंद आरोग्य व सफाई कर्मचारी समवेत साजरा करून केला द्विगुणित
सर्वांच्या आरोग्याची गुढी आपण उभारली पाहिजे.

राजवर्धन पाटील यांनी गुढीपाडवाचा आनंद आरोग्य व सफाई कर्मचारी समवेत साजरा करून केला द्विगुणित
सर्वांच्या आरोग्याची गुढी आपण उभारली पाहिजे.
इंदापूर(प्रतिनिधी)
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी आज मराठी नववर्ष व गुढीपाडव्याचे औचित्य साधत इंदापूर नगरपालिकेच्या आरोग्य सफाई व स्वच्छता कर्मचारी यांच्यासमवेत हा आनंदाचा क्षण साजरा करीत त्यांच्याविषयी आपुलकी दाखवीत हा सण साजरा केला.
राजवर्धन पाटील म्हणाले की,’ जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण मानवी आरोग्य धोक्यात आले असताना या आरोग्य सफाई व स्वच्छता कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात आरोग्यसेवा व साफसफाईचे काम करत मानवी जीवन सुरक्षित केले आहे त्यांचे हे काम पाहून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची ही आपल्यासाठी छोटीशी संधी असल्याने आपण हा आनंदाचा सण या कर्मचाऱ्यास समवेत साजरा केला आहे. खरे तर हा घटक समाजात सतत दुर्लक्षित असतो पण यांच्यामुळे आपण आपल्या आरोग्य निरोगी जगतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सर्वांचे आपण आभार मानून खऱ्या अर्थाने या सर्वांच्या आरोग्याची गुढी आपण उभारली पाहिजे.