राजू शेट्टी यांचा बारामतीतून सरकारवर हल्लाबोल;शक्तिपीठ महामार्गात पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा
हा रस्ता ३० ते ३५ हजार कोटीत होणे अपेक्षित आहे

राजू शेट्टी यांचा बारामतीतून सरकारवर हल्लाबोल;शक्तिपीठ महामार्गात पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा
हा रस्ता ३० ते ३५ हजार कोटीत होणे अपेक्षित आहे
बारामती वार्तापत्र
देशात तयार केल्या जाणार्या एक किलोमीटरच्या सहा पदरी रस्त्यासाठी साधारण ३५ कोटी रुपये खर्च येतो. शक्तिपीठ महामार्ग ८०२ किलोमीटर लांबी आहे.या अंतराचा हिशोब केल्या त्याचा खर्च ८६ हजार ३०० कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे.
म्हणजे एका किलोमीटरसाठी १०७ कोटी ६० लाख कोटी म्हणजे तिप्पट खर्च जास्त येतो. हा रस्ता ३० ते ३५ हजार कोटीत होणे अपेक्षित आहे.त्यानुसार या महामार्गात पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना केला.
यावेळी शेट्टी पुढे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा भाविकांसाठी नाही, विकासासाठी नाही, तर राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचा दावा शेट्टी यांनी केला.अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे. आमचं सरकार आलं, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र हे आश्वासन त्यांनी बाजूला ठेवलं.
या अर्थसंकल्पात त्याची तरतूद व्हायला हवी होती. ती झाली नाही. मागच्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी जे अनुदान मिळत होते, ते अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांसाठी अनेक अनुदानाच्या योजना जाहीर केल्या. मात्र अनुदान मिळाले नसल्याचे शेट्ठी यांनी निदर्शनास आणले.