राजेंद्र सागर यांनी नव्याने सुरू केलेला फिरता डिझेल पंपाचा व्यवसाय युवकांसाठी प्रेरणादायी : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
फिरत्या डिझेल पंपामुळे अनेकांना होणार लाभ
राजेंद्र सागर यांनी नव्याने सुरू केलेला फिरता डिझेल पंपाचा व्यवसाय युवकांसाठी प्रेरणादायी : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
फिरत्या डिझेल पंपामुळे अनेकांना होणार लाभ
इंदापूर : प्रतिनिधी
सरडेवाडी ता.इंदापूर येथील युवक राजेंद्र सागर यांनी स्टार्टअप योजनेतुन फिरता डिझेल पंप हा व्यवसाय चालू केला आहे. या डिझेल टँकरचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री भरणे म्हणाले की,राजेंद्र सागर यांनी नव्याने सुरू केलेल्या फिरत्या डिझेल टँकरच्या व्यवसायाचा फायदा हा सर्वसामान्य शेतकरी वर्गाला होणार असून शेतामध्ये लागणाऱ्या सर्व वाहनांना जागेवरच पुरवठा होणार आहे.तसेच डिझेल घेण्याकरिता आता पंपावर जाण्याची गरज नाही कुठेही रस्त्यावर ,शेताजवळ,एमआआयडीसी जवळ,रस्ते कामात थेट त्यांच्या कामापर्यंत याने डिझेल पुरवठा होऊ शकतो.अशाप्रकारचे नवनवीन व्यवसाय तरुण पिढीने चालू केल्याने भविष्यात तरुण वर्गाचा नक्कीच व्यवसायाकडे कल निर्माण होणार असल्याचे सांगून राजेंद्र सागर यांनी नोकरीच्या मागे न लागता फिरत्या डिझेल पेट्रोल पंपाचा व्यवसाय सुरू करून उद्योजक होण्याच्या दृष्टीने पाऊले टाकले असून त्यांचा हा निर्णय युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी भरणे यांनी उपस्थितांसमोर काढले.
यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,अभिजित तांबिले, पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे यांच्यासह सरडेवाडी पंचक्रोशीतील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.