स्थानिक

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन

जळगाव येथे लग्न समारंभादरम्यान आला हृदयविकाराचा झटका..!

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन

जळगाव येथे लग्न समारंभादरम्यान आला हृदयविकाराचा झटका..!

बारामती वार्तापत्र 

महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय 54) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. ते दरोडी, ता पारनेर, जि.

अहिल्यानगर येथील रहिवाशी होते.
तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सन 1991 मध्ये कनिष्ठ अभियंता या पदापासून सुनिल पावडे यांनी वीज क्षेत्रातील सेवेला सुरुवात केली. सन 2006 मध्ये सरळसेवा भरतीतून ते कार्यकारी अभियंता झाले. नोव्हेंबर 2015 मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी पुणे ग्रामीण व नाशिक शहर मंडलात काम केले.

तर सन 2018 मध्ये सरळसेवेतून मुख्य अभियंता म्हणून त्यांनी बारामती परिमंडलात काम केले. मुख्य अभियंता म्हणून काम करत असताना त्यांनी महाराष्ट्राला ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम दिला. दैनंदिन कामातही त्यांनी स्वत:ची छाप कायम सोडली. बारामती परिमंडल कायम अग्रेसर राहील याची काळजी घेतली. मुख्य अभियंता म्हणून त्यांनी बारामती येथे 6 वर्षे काम केले. या दरम्यानच्या काळात त्यांनी काही काळ प्रादेशिक संचालक पदाचा कार्यभारही सांभाळला. जुलै 2024 मध्ये त्यांची कार्यकारी संचालक पदी निवड झाली होती. अत्यंत कर्तव्यनिष्ठ व शिस्तप्रिय अभियंता अशी सुनिल पावडे यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे महावितरणच्या वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. पावडे यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी निशिगंधा, मुलगी मृणाल व मुलगा सोहम असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!