राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी बाप्पाचं आगमन
भक्तिमय वातावरणात श्रींची विधिवत प्रतिष्ठापना

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी बाप्पाचं आगमन
भक्तिमय वातावरणात श्रींची विधिवत प्रतिष्ठापना
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बुद्धिदात्या गणरायाचे शुक्रवारी मुंबई, पुण्यासह राज्यभरात मंगलमय वातावरणात आगमन झाले.दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी मोठ्या भक्तिमय वातावरणात व जल्लोषात स्वागत करून श्रींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
राज्यावरील कोरोनाचे संकट लवकरच टळू दे,इंदापूर तालुक्यासह राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे ! अस साकडं गणरायाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घातलं.तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे देखील आवाहन केले.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे शुक्रवारी ( दि.१० ) घराघरांत आगमन झाले.कोरोनाच्या संकटातही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत असून अनेकांनी काही दिवसांपासून बाप्पाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी बाजारांत गर्दी केली. मंगलध्वनी, आरती आदी भक्तिमय वातावरणात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पुढील दहा दिवस उत्तरोत्तर उत्सव रंगत जाणार आहे.