राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले तेजस गायकवाड यांनी केलेल्या देखाव्याचे कौतुक
भारत की आजादी हा देखावा केला होता तयार

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले तेजस गायकवाड यांनी केलेल्या देखाव्याचे कौतुक
भारत की आजादी हा देखावा केला होता तयार
निमगाव केतकी ; प्रतिनिधी
निमगाव केतकी येथील तेजस गायकवाडने साकारलेल्या “भारत की आजादी” का अमृत महोत्सवला दि.१६ सप्टेंबर रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली.
तेजस गायकवाडने आपल्या घरातील गौरी गणपती समोर देशाच्या अमृतमहोत्सवा निमित्त शहीदांच्या आठवणी जागवणारा देखावा बनवला.या देखाव्यामध्ये भारताचा संपूर्ण इतिहास, लाल किल्ला, सरदार पटेल यांचे statue of unity , भारतीय संसद ,भारताचे सर्व पंतप्रधान, भारतरत्न व भारत देशाने ७५ वर्षात सर्व क्षेत्रात केलेली क्रांती हा देखावा बनवला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा सर्व देखावा पाहून खरोखरच हा देखावा कौतुकास्पद व देशाला अभिमान वाटण्यासारखा आहे. अशा शब्दात तेजस गायकवाडचे कौतुक केले.
यावेळी गायकवाड कुटुंबीयांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले व त्यांचा सन्मान केला.