राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते निरवांगी, दगडवाडी व पिटकेश्वर येथे गुरुवारी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
३० कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते निरवांगी, दगडवाडी व पिटकेश्वर येथे गुरुवारी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
३० कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी व पिटकेश्वर येथे सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१७) ३० कोटी ८० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न होणार असून सायंकाळी ५.१५ वाजता निरवांगी येथे जाहीर सभा होणार आहे.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत.पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर,युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदरील निधीच्या माध्यमातून निमगाव केतकी – निरा नरसिंहपुर रस्ता,निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रसूतिगृह,प्राथमिक आरोग्य केंद्र,वैद्यकीय अधिकारी निवासस्थान,प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, बी.के.बी.एन ते राऊत रस्ता काँक्रीटीकरण,निरवांगी ग्रामपंचायत कार्यालय इमारत,निरवांगी येथील पाणी टाकी,खुली व्यायाम शाळा या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे.