पॉलिटेक्निक कॉलेजचे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी वरदान
ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू होणार"

पॉलिटेक्निक कॉलेजचे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी वरदान
“ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू होणार”
इंदापूर प्रतिनिधी –
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजने शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम, सक्षमीकरण आणि कौशल्याधारित शिक्षण पुरवण्याचा ध्यास घेतला आहे. संस्थेमार्फत एम.के.सी.एल.च्या ‘आय-लाईक’ ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्रेडिट बेस्ड कोर्सेस मोफत दिले जात आहेत. हे कोर्सेस अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये नोंदवले जात असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि औद्योगिक उंची वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी दिली.
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे (दि.21) रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात विद्या प्रतिष्ठानकडून, शैक्षणिक, सामाजिक आली. यावेळी महाविद्यालयाच्या व औद्योगिक उपक्रमांविषयी थेट माहिती घेतली. यावेळी प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे बोलत होते.
प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, भारत सरकार मान्य ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ यामधून, विद्यार्थ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी मोठी संधी निर्माण करत आहे.या केंद्रांतर्गत सध्या सीएनसी प्रोग्रॅमिंग तसेच पीसीबी मेकिंग हे दोन कोर्सेस सुरू असून ते संपूर्णतः मोफत आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
“ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू होणार”
जर्मन भाषा प्रशिक्षणच्या ड्रोन पायलट ट्रेनिंगचे केंद्र ग्रामीण भागात पहिल्यांदाच तयार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधीची कवाड खुली करून देण्यात महाविद्यालयाने गरुडझेप घेतली आहे. गरुडा एरोस्पेससोबत सामंजस्य करार करून लवकरच कॉलेजमध्ये ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे.माध्यमातून परदेशी करिअरची संधी उपलब्ध होतील. याचा लाभ इंदापूर तालुक्यांतील पालकांनी विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गुन्ह्यांचे विश्लेषण करण्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार
विद्या प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपतानाच, अतिशय महत्वाच्या सायबर क्राईम विश्लेषणात, इंदापूर पोलीस स्थानकासोबत सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण करण्यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. सायबर क्राईमचे डेटा अॅनालिसिस आणि मशीन लर्निंग वापरून विश्लेषण करून संबंधित माहिती पुणे येथील संशोधन केंद्राला दिली जाणार आहे.