राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी ४९ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
शहा येथे होणार जाहीर सभा
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी ४९ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
शहा येथे होणार जाहीर सभा
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी (दि.६) वडापुरी गणात ४९ कोटींच्या विविध विकास कामांची भूमिपूजने संपन्न होणार असून शहा येथे सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर मंगल सिद्धीचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र तांबिले, पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापआबा पाटील,जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, ज्येष्ठ नेते प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष अतुल झगडे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छायाताई पडळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.