इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्या तरंगवाडी व गोखळी येथे ८ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

गोखळी या ठिकाणी होणार जाहीर सभा

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्या तरंगवाडी व गोखळी येथे ८ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

गोखळी या ठिकाणी होणार जाहीर सभा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील मौजे तरंगवाडी व गोखळी येथे शुक्रवारी (दि.१८) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ८ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने,जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे,तरंगवाडी चे सरपंच कान्होपात्रा गोविंद जाधव , उपसरपंच कांतीलाल तरंगे,गोखळी च्या सरपंच अलका बापू पोळ,उपसरपंच सचिन तरंगे हे असणार आहेत.

सदरील निधीतून तरंगवाडी-गोखळी रस्ता , तरंगवाडी ओढ्यातील पूल, गोखळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तरंगवाडी व गोखळी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर,सचिन खामगळ, हामा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच सायंकाळी ६ वाजता गोखळी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

Related Articles

Back to top button