राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज तावशी येथे १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून तालुक्यात करोडो रुपयांचा निधी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज तावशी येथे १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून तालुक्यात करोडो रुपयांचा निधी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे तावशी येथे शनिवारी (दि.१९) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, पीडीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, छत्रपती कारखान्याचे संचालक रणजीत निंबाळकर,छत्रपती कारखान्याचे संचालक रसिक सरक, छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. कमलाकर व्होरकाटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर हे असणार आहेत.
सदरील निधीतून तावशी-उदमाईवाडी-थोरातवाडी रस्ता, तावशी – भवानीनगर रस्ता, तावशी- -सपकळवाडी-सणसर रस्ता, तावशी येथील जाधववस्ती ते थोरातवस्ती रस्ता तसेच तावशी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
याप्रसंगी छत्रपती कारखान्याचे संचालक डॉ. दिपक निंबाळकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेजसिंह पाटील,छत्रपती कारखान्याचे संचालक सर्जेराव जामदार, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, अरविंद भोसले,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,सचिन खामगळ, हामा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच सायंकाळी ६ वाजता तावशी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.