राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची आढावा बैठक संपन्न
विकासकामांकरिता पाठपुरावा करण्याच्या सरपंच व ग्रामसेवकांना सूचना

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची आढावा बैठक संपन्न
विकासकामांकरिता पाठपुरावा करण्याच्या सरपंच व ग्रामसेवकांना सूचना
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती इंदापूर येथे गुरुवारी (दि.३१) कामकाज आढावा बैठक पार पडली. बैठकीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.बैठकीस गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, अभिजित तांबिले,प्रतापराव पाटील, वरकुटे खुर्दचे सरपंच बापुराव शेंडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की,सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवकांनी प्रत्येक गावाच्या विकासाकरिता चांगला आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्या आराखड्यातील कामांसाठी शासनाच्या विविध योजनेतून, विविध विभागातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जनतेला त्याचा लाभ मिळावा यासाठी चांगल्याप्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे. गावातील सर्व विकासकामांचे प्रस्ताव तयार करून कामे कशी करता येतील त्याचबरोबर पाच हजाराहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांना नागरी सुविधांमधून कामे कशी करता येतील याचा अभ्यास करून विकासकामांचा पाठपुरावा सरपंचांनी करणे आवश्यक आहे.
यावेळी आदर्श सरपंच, ग्रामसेवक तसेच गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.