राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज होणार २९ कोटी ८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
डाळज नं.२ येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज होणार २९ कोटी ८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
डाळज नं.२ येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज (दि.१६) डाळज नं.१, डाळज नं.२, डाळज नं.३ व पोंधवडी, भादलवाडी येथील २९ कोटी ८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजने संपन्न होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटील,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीण माने,पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,पंचायत समितीच्या सदस्या शितल वणवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.एन. जगताप,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार पानसरे,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर, डाळज नं.२ चे सरपंच ॲड. प्रदीप जगताप, उपसरपंच धनश्री डोईफोडे,डाळज नं.१ चे सरपंच विकास कुंभार,उपसरपंच प्रमिला झोळ,डाळज नं.३ च्या सरपंच प्रियंका गलांडे, उपसरपंच विश्वजीत गायकवाड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, संचालक,पदाधिकारी व ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच डाळज नं.२ येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे.
सदरील निधीच्या माध्यमातून डाळज नं.१ येथे १ कोटी २५ लाख, डाळज नं.२ येथे १३ कोटी ६६ लाख, डाळज नं.३ येथे ८३ लाख व पोंधवडी-भादलवाडी-डाळज रस्ता १४ कोटी अशी विविध विकास कामे होणार आहेत.