राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणल्या फळ विक्रेत्यांच्या भावना ; दिली मायेची सावली
फळ विक्रेत्यांनी मंत्री भरणेंची कृतज्ञता व्यक्त केली
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणल्या फळ विक्रेत्यांच्या भावना ; दिली मायेची सावली
फळ विक्रेत्यांनी मंत्री भरणेंची कृतज्ञता व्यक्त केली
इंदापूर : प्रतिनिधी
मे महिन्यातील रखरखते उन्ह झेलत पोटाची खळगी भरण्यासाठी इंदापूर बाह्यवळण रस्त्यावर बसलेल्या फळ विक्रेत्यांची भावना जाणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जवळपास ५० ते ६० फळ विक्रेत्यांना मोफत छत्री वाटप करत मायेची सावली दिली आहे.त्यामुळे फळ विक्रेत्यांनी मंत्री भरणेंची कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रितेश भरणे, राष्ट्रवादीचे युवा नेते दीपक जाधव, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रमुख सागर पवार, अक्षय कोकाटे, सचिन शिरसट, लक्ष्मण जाधव, शिवाजी तरंगे, प्रतिक झोळ, विजय आवटे उपस्थित होते.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वत्र तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेलं आहे.त्यामुळे यावेळचा उन्हाळा सहन करणे कठीण आहे. हेच लक्षात घेता नेहमी इंदापूर बाह्यवळण मार्गांवरून प्रवास करणाऱ्या मंत्री भरणे यांनी अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडाक्याच्या उन्हापासून येथील फळ विक्रेत्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने छत्री वाटप केले.राज्यमंत्री भरणे नेहमीच गोरगरिब व सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत व त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात.त्यामुळेच या क्रियाशील नेत्याला इंदापूर तालुक्यातील जनतेने सलग दुसऱ्यांदा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. आणि म्हणूनच या लाडक्या मामांच्या तोंडून ही गोरगरीब व सर्व सामान्य जनता हीच माझी खरी ताकत आहे. हे शब्द नेहमीच बाहेर येत असतात.