राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते आज पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटात ९७ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
सायंकाळी ६ वा. पळसदेव येथे जाहीर सभा
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते आज पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटात ९७ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
सायंकाळी ६ वा. पळसदेव येथे जाहीर सभा
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटात ९७ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटने संपन्न होणार आहेत. तसेच सायंकाळी ठीक ६.३० वाजता पळसदेव येथे जाहीर सभा होणार आहे.
सदरील कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य विभाग सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य प्रतापराव पाटील, मा.सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दिपक जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, वरकुटे चे सरपंच बापूराव शेंडे,पंचायत समितीचे मा. सदस्य बाळासाहेब काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल भिसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल झगडे हे प्रमुख पाहुणे असतील.तर पळसदेव,चांडगाव, लोणी देवकर,करेवाडी,वरकुटे,कळाशी,बळपुडी,न्हावी, रुई, बिजवडी, गंगावळण, अगोती नं.१,२,३., कालठण नं.१,२., भावडी, शिरसोडी, पिंपरी खुर्द, पडस्थळ,अजोती, सुगाव, कौठळी, गलांडवाडी नं.१, माळवाडी नं.१,२ येथील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
सध्या इंदापूर तालुक्यात असं एक गावं नाही जिथं राज्यमंत्र्यांचं कामं नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे.मंत्री भरणे यांनी इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी करोडो रुपयांचा विकास निधी खेचून आणला असून माझ्या रक्तातच कामं आहे असं ते ठणकावून सांगत आहेत.