इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते आज बावड्यात ६९ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन

सायंकाळी ६ वा. बाजारतळ येथे जाहीर सभा

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते आज बावड्यात ६९ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन

सायंकाळी ६ वा. बाजारतळ येथे जाहीर सभा

इंदापूर : प्रतिनिधी

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बावड्यात ६९ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न होणार आहे. तसेच सायंकाळी ठीक ६ वाजता बावडा बाजारतळ या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

सदरील कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मा.सदस्य प्रतापराव पाटील,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य विभाग सभापती प्रवीण माने,पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दिपक जाधव,जिल्हा परिषदेचे मा.सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, वरकुटे चे सरपंच बापूराव शेंडे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, जेष्ठ नेते बाळासाहेब करगळ, जेष्ठ नेते दत्तात्रय घोगरे यांसह येथील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

सदरील निधीच्या माध्यमातून ५७ कोटी रुपयांच्या बावडा – नरसिंहपूर रस्त्याचे लोकार्पण, ४ कोटी रुपयांच्या बावडा ते गणेशवाडी रोडचे चौपदरीकरण,३ कोटी रुपयांचा बावडा ते भांडगाव रस्त्यावरील पूल,२ कोटी रुपयांचा बावडा – गणेशवाडी ते गार अकोले रस्ता तसेच ३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram