राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते उद्या इंदापूर शहरात भूमिगत विद्युत वाहिनीचे भूमिपूजन
अनेक दिवसांपासूनचा प्रश्न अखेर मार्गी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते उद्या इंदापूर शहरात भूमिगत विद्युत वाहिनीचे भूमिपूजन
अनेक दिवसांपासूनचा प्रश्न अखेर मार्गी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील सावतामाळी नगर, आंबिकानगर परिसरात १ कोटी ३४ लाख रुपयांच्या ३३ के.व्ही.एच.टी भूमिगत विद्युत वाहिनीचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते सोमवारी (दि.१३) सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. सदरील भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर असणार आहेत.
इंदापूर शहरातून भाटनिमगावकडे जाणारी ३३ के.व्ही.एच.टी विद्युत वाहिनी लोकवस्तीतून जात असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता होती, त्यामुळे या भागातील नगरसेवक पोपट शिंदे व स्थानिक नागरिकांकडून विद्युत वाहिनी भूमिगत करण्याची मागणी वारंवार तालुक्याचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात येत होती.त्या पार्श्वभूमीवर मंत्री भरणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला आहे.
सदरील भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, विद्यमान नगरसेवक पोपट शिंदे, स्वप्नील राऊत यांच्यासह शहरातील आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.