राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कॉलरला हात?
गैरसमजातून प्रकार झाल्याचे भरणें कडून स्पष्टीकरण
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कॉलरला हात?
गैरसमजातून प्रकार झाल्याचे भरणें कडून स्पष्टीकरण
बारामती वार्तापत्र
वन राज्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या महिलेने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कॉलरला हात लावून जाब विचारल्यामुळे व अशा बातम्या आज प्रसिद्धी माध्यमांमध्ये आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर रेडणी, तालुका इंदापूर येथील तीन-चार महिलांसह कुटूंबाने उपोषण केले होते. या उपोषण कर्त्या महिलेने स्वतःच्या मुलावरती दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे व माझ्या मुलाला तुम्ही शिवीगाळ का केली? यावरून वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शर्ट ला पकडून ही महिला भरणे यांना जाब विचारत होती.
घरासमोर उपोषणाला बसलेल्या महिलेची विचारपूस करून आंदोलन मागे घ्यावे म्हणून चर्चा करण्यासाठी मंत्री दत्तात्रय भरणे हे त्या कुटुंबाची समजूत घालत असताना हा प्रकार घडला. मात्र असे असले तरी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखवलेली सामंजस्य भूमिका व संयमीपणा याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.
त्या कुटुंबावर अन्याय झाला असेल तर त्यांना त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांनी केलेला अन्याय सहन करणार नाही. तसेच त्यांच्या मुलाला झालेली शिवीगाळ हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे राज्यमंत्री भरणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.