इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ३६ ग्रामपंचायतीवर तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा ३७ ग्रामपंचायतीवर दावा

आजी-माजी मंत्र्यांनी व्हिडिओ प्रसारित करून केला दावा

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ३६ ग्रामपंचायतीवर तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा ३७ ग्रामपंचायतीवर दावा

आजी-माजी मंत्र्यांनी व्हिडिओ प्रसारित करून केला दावा

इंदापूर:प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज (दि.१८) रोजी लागला असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनुक्रमे ३६ व ३७ ग्रामपंचायती आमच्याच पक्षाच्या असल्याचा दावा केला आहे.

आजी-माजी मंत्र्यांनी दावा केला असला तरी प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी स्थानिक आघाडीस सत्ते इतपत बहुमत मिळाले असल्याने त्या गावातील स्थानिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आम्ही कोणत्या पक्षाचे नाही असा खुलासा केला असून सदरील दाव्यात किती तथ्य आहे. हे इंदापूर तालुक्यातील जनतेस थोड्याच दिवसात पाहावयास मिळणार हे मात्र नक्कीच.

दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः व्हिडिओ प्रसारित करून हा दावा केला आहे.

Related Articles

Back to top button