राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे एक पाऊल इंदापूरच्या प्रगतीकडे; प्रलंबित लाकडी निंबोडी उपसा जल सिंचन प्रकल्प सर्व्हेच्या कामाचा प्रारंभ
खऱ्या अर्थाने विकास गंगा नांदणार...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे एक पाऊल इंदापूरच्या प्रगतीकडे; प्रलंबित लाकडी निंबोडी उपसा जल सिंचन प्रकल्प सर्व्हेच्या कामाचा प्रारंभ
खऱ्या अर्थाने विकास गंगा नांदणार…
इंदापूर : प्रतिनिधी
जे काम मार्गी लावल्यानंतर तालुक्याच्या आमदाराचे पाय वर्षानुवर्षे भक्कम होणार आहेत.अशा कामास इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हात घालून तडीस लावण्याचा विडा उचलला आहे. त्या लाकडी निंबोडी उपसा जल सिंचन प्रकल्पाच्या सर्व्हेच्या कामाचा प्रारंभ नुकताच पार पडला.
गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस चर्चिल्या जाणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या कामाला आता खऱ्या अर्थाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गती मिळणार असेच दिसू लागले आहे. या योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील पंधरा गावांच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली असून लवकरच याबाबतचा अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे समझते.
महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील व इंदापूर तालुक्याचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या आहेत.त्यामुळे या लाकडी निंबोडी योजनेकडे आस लावून बसलेला शेतकरी सुखावला असून योजनेला गती मिळत असल्याने शेतकऱ्याचे लक्ष या योजनेकडे लागले आहे.
आगामी दोन ते तीन महिन्यात सदरील योजनेचे सर्वेक्षण करण्याचे संबंधितांवर बंधनकारक असून सर्वेक्षणाची माहिती प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा अहवाल तयार करून पुणे येथील राज्यस्तरीय सल्लागार समितीकडे तपासणीसाठी पाठवला जाणार आहे.यानंतर समितीच्या अभिप्रयासह योजनेचा प्रस्ताव शासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला जाणार आहे.
ही योजना मार्गी लागल्या नंतर इंदापूर तालुक्यातील अनेक गावात पाण्याची गंगा नादनार आहे.त्यामुळे हजारो एकर क्षेत्र लागवडीखाली येणार असून असंख्य शेतकरी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाय इंदापूर तालुक्यातील राजकारणात अधिकच भक्कम होणार असल्याचे मत इंदापूर तालुक्यातील राजकिय विश्लेषकांनी वर्तविले आहे.