राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं ,18 मे पर्यंत पोलिस कोठडी
केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं ,18 मे पर्यंत पोलिस कोठडी
केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही.
मुंबई :प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकी हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झालेले आहेत.
केतकी हिने वकील घेतला नाही. तिने स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तर, ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. यावेळी न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं.