राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, म्हणाले, माझी ताकद म्हणजे ४२ आमदार नव्हे तर जनता
मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली.
राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, म्हणाले, माझी ताकद म्हणजे ४२ आमदार नव्हे तर जनता
मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली.
मुंबई,प्रतिनिधी
संभाजीराजे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राज्यसभा निवडणूक लढविणार नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही. पण ही माझी माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे, असे संभाजीराजे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी ते म्हणाले, ज्या आमदारांनी फॉर्मवर सह्या केल्या त्या सर्वांचे आभार मानतो. त्या आमदारांच्या आयुष्यभर मी पाठीशी राहीन. केव्हाही त्यांनी हाक द्यावी संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेत असणार.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, नेत्यांबद्दल खुलासे केले आहेत. सुरुवातीलाच संभाजीराजेंनी महाराष्ट्रातल्या जनतेचेही आभार मानले आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यसभा निवडणुकीबद्दलची भूमिका स्पष्ट करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती. पण मी स्पष्ट शब्दात नकार दिला होता, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेच प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता ,असे संभाजीराजे यांनी सांगितले. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला
त्यावेळी पुन्हा मला शिवसेनेत प्रवेशाचं म्हटलं, त्यावर मी नकार दिला. मग पुन्हा ड्राफ्टवर चर्चा झाली आणि हा ड्राफ्ट अंतिम झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर बातम्टा आल्या की, उद्या शिवसेनेत प्रवेश करणार म्हणून. त्यानंतर कोल्हापुरात पोहोचलो तेव्हा कळालं की, संजय पवार यांना उमेदवारी जाहीर. मग मंत्र्यांना फोन केला त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मुख्यमंत्र्यांना फोन केला त्यांनीही फोन रिसिव्ह केला नाही. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती त्यांनी मला दिलेला शब्द मोडला असं संभाजीराजे यांंनी म्हटलं.