राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर वाहतुकीच्या नियम मोडल्यावरून दंडात्मक कारवाई, इतका मोठा दंड..
बहुतेक नेत्यांच्या वाहनांवर चलने पेंडिंग

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर वाहतुकीच्या नियम मोडल्यावरून दंडात्मक कारवाई, इतका मोठा दंड..
बहुतेक नेत्यांच्या वाहनांवर चलने पेंडिंग
पुणे :प्रतिनिधी
वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताचा फोटो काढून त्याच्यावर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सरकारचे नियम आणि सामान्य नागरिक यांचे कधीच जुळल्याचे पाहायला मिळत नाही. परंतु, आता राजकीय नेत्यांचेही सरकारच्या नियमांशी जुळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अत्यंत कडक शिस्तीचे आणि नियमाचे बंधन पाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वाहतूक नियमांच्या कचाट्यात सापडले आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्यावरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय.
नेहमीच सर्वसामान्यांना सल्ले देणारे, मार्गदर्शन करणारे जिल्ह्यातील नेते, मंत्री आणि आमदारांच्या वाहनांनीच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्ह्यात सर्वाधिक वाहने वापरणारे आमदार सुनील शेळके वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पोलिसांना, वाहतूक पोलिसांना सहकार्य करा, कायद्याने घालून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नका, स्वत:सोबत दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका, अशा अनेक सुचना हे नेतेमंडळी वारंवार देताना पाहायला मिळतात. मात्र आता या राजकीय नेत्यांनीच वाहतूक नियम न पाळल्याने सर्वसमान्य नागरिकांवर कारवाई होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
बहुतेक नेत्यांच्या वाहनांवर चलने पेंडिंग वाहतूक नियम तोडण्यात सर्वाधिक आघाडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्यांच्या दोन वाहनांवर २७,८०० रुपयांचा दंड होता. त्यांनी नुकतीच सर्व रक्कम ऑनलाईन भरली आहे. सर्वाधिक १४,२०० रुपये दंड भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना ५, २०० रुपये, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ६०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. बहुतेक सर्व नेत्यांच्या वाहनांवर अनेक प्रकारची चलने पेंडिंग आहेत.